स्वयंघोषित संत आणि फरारी नित्यानंदच्या (Nithyananda) “युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास” (United States of Kailasa) ने 30 हून अधिक अमेरिकन शहरांसोबत “सांस्कृतिक भागीदारी” करत त्यांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे, अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील नेवार्क शहराचा काल्पनिक देशासह सिस्टर-सिटी” (sister-city) करार झाल्याचे या मिडीया रिपोर्टमधून समोर आले आहे. आता नेवार्क शहराने काल्पनिक हिंदू राष्ट्रासह कराराचा स्कॅम झाल्याचे मान्य केले आहे. कारण कैलासा नावाचा कोणताच देश अस्तित्वात नाही. यामुळे आता या कराराला नेवार्क शहराच्या काउंसिलने तत्काळ स्वरुपात रद्द केला आहे.
पहा व्हिडिओ -
A fake Indian guru scammed 30 American cities #FoxNews pic.twitter.com/Xhpc3XIzZO
— Jesse Watters Primetime (@jesseprimetime) March 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)