अमेरिकेतील होंडुरासमधील महिला तुरुंगात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे मंगळवारी झालेल्या दंगलीत किमान 46 महिलांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. होंडुरासच्या राष्ट्रीय पोलीस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी सांगितले की, तेगुसिगाल्पापासून वायव्येस सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या तमारा येथील महिला तुरुंगात दंगल आणि हिंसाचार झाला, ज्यामध्ये अनेक महिलांचा मृत्यू झाला. यातील काहींना गोळ्या लागल्या, काहींना जाळले, तर काहींच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. बेकायदेशीर कारवायांवरून दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये हे मृत्यू झाले आहेत.

देशाच्या तुरुंग यंत्रणेच्या प्रमुख ज्युलिसा विलानुएवा यांनी या संपूर्ण घटनेवर दु:ख व्यक्त केले असून, दंगलीत सहभागी असलेल्या संघटित टोळीवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. कारागृहातील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी कठोर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, त्याला विरोध करण्यासाठीच दोन गटांमध्ये ही दंगल घडल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Chicago Shootout Video: शिकागोच्या विलोब्रुकमध्ये अंधाधुद गोळीबार, 29 जणांना गोळ्या, पाहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)