माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Barack Obama आणि फर्स्ट लेडी Michelle Obama यांनी जाहीररित्या Kamala Harris यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचं कौतुक केले आहे. बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांच्यासोबत फोनवर बोलून आपला पाठिंबा दिला आहे. 'कमला हॅरिस उत्तम राष्ट्रपती होऊ शकतात आमचा त्यांना पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचं' ओबामा यांनी म्हटलं आहे. 'नोव्हेंबरमध्ये हॅरिसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं ओबामा म्हणाले आहेत. "मिशेल आणि मी सध्या कमला हॅरिस बद्दल अभिमान बाळगून आहोत. अमेरिकन लोकांना हॅरिसला पाठिंबा देण्यासाठी त्यांना निवडणूक देण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले असल्याचे ते म्हणाले आहेत. US Presidential Election 2024 मध्ये शर्यतीत Kamala Harris च्या यशासाठी भारतात Tamil Nadu मधील त्यांच्या गावात खास प्रार्थना, शुभेच्छांचा वर्षाव.  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)