Bangladesh Crisis: बांग्लादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, देश आता अंतरिम सरकार चालवेल. आम्ही देशात शांतता प्रस्थापित करू असे त्यांनी सांगितले. आम्ही नागरिकांना हिंसा थांबवण्याची विनंती करत आहोत. गेल्या काही आठवड्यात झालेल्या सर्व हत्यांचा तपास आम्ही करू, असे त्यांनी सांगितले. बांग्लादेशचे लष्करप्रमुख म्हणाले की, देशात कर्फ्यू किंवा कोणत्याही आणीबाणीची गरज नाही, आज रात्रीपर्यंत सगळे काही सुरळीत होईल. हे देखील वाचा: Asia's First Breast Milk Bank at Sion Hospital: मुंबई येथील सायन रुग्णालात 'ब्रेस्ट मिल्क' बँकेद्वारे 10,000 नवजात बालकांना दूध पुरवठा
पाहा पोस्ट:
Bangladesh Army Chief says, "PM Sheikh Hasina has resigned. Interim Government to run the country." - reports Reuters pic.twitter.com/tGR3FgGVvn
— ANI (@ANI) August 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)