अलीबाबा समूह आपला व्यवसाय 6 कंपन्यांमध्ये विभागण्याची तयारी करत आहे. यात ई-कॉमर्स, मीडिया आणि क्लाउड बिझनेस व्यवसायाचाही समावेश आहे. कंपनीने मंगळवारी 28 मार्च रोजी ही माहिती दिली. कंपनी 6 स्वतंत्र बिझनेस युनिट्समध्ये विभाजित होणार असल्याचे बातमीनंतर अलीबाबाचे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढले आहेत.

यासोबतच अलीबाबाने असेही म्हटले आहे की, हा कंपन्या त्यांच्या स्तरावर निधी उभारण्याच्या किंवा इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) आणण्याच्या शक्यतेचा विचार करतील. वृत्तसंस्था रॉयटर्सने एका वृत्तात ही माहिती दिली आहे. या सर्व 6 कंपन्यांचे व्यवस्थापन त्यांचे स्वतःचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ करतील. अलीबाबा ग्रुप आता होल्डिंग कंपनी मॅनेजमेंट मॉडेलचे अनुसरण करेल आणि डॅनियल झांग हे ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत राहतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)