आकाशात वरचेवर अशा अनेक खगोलीय घटना घडतात ज्यांचा परिणाम पृठीवर होत असतो. आता अशाच एका घटनेमुळे जग पुन्हा एकदा धोक्याचा सामना करत आहे. शास्त्रज्ञांनी नोंदवले की माउंट एव्हरेस्टपेक्षा तीनपट मोठा असलेल्या धूमकेतूचा स्फोट झाला असून, आता तो पृथ्वीच्या दिशेने झेपावत आहे. हा स्फोट 5 ऑक्टोबर रोजी झाला होता. लाइव्ह सायन्सच्या वृत्तानुसार, या धूमकेतूचा व्यास 18.6 मैल आहे. माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीवरील सर्वोच्च पर्वत असून तो 29,029 फूट किंवा सुमारे 5.5 मैल उंच आहे. गेल्या चार महिन्यातील ही अशी दुसरी खगोलीय घटना आहे. हा धूमकेतू नंतर सौरमालेत परत जाईल आणि 2095 पर्यंत त्याचा वैश्विक पुनरागमन दौरा असणार नाही. (हेही वाचा: Mission Gaganyaan: इस्रोकडून गगनयान मोहिमेची तयारी जवळपास पूर्ण; 21 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार TV-D1 ची चाचणी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)