गेल्या अनेक महिन्यांमध्ये जगभरातील विविध कंपन्यांमध्ये नोकर कपातीची लाट सुरु आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. सॉफ्टवेअर कंपनी Okta Inc. ने आपल्या 300 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड मॅककिनन (Todd McKinnon) यांनी या नोकर कपातीबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितले की, Okta आपल्या 5% कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. गुरुवारी कर्मचार्‍यांना एका ईद्वारे याबाबत माहिती देण्यात आली, तसेच कंपनीच्या कॉर्पोरेट ब्लॉगवर देखील याबाबत पोस्ट केले गेले होते.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)