रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपला 4जी फोन (4G Phone) 'Jio Bharat V2' लॉन्च केला आहे. नवीन 'Jio Bharat V2' अतिशय वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. माहितीनुसार या फोनची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनद्वारे कंपनी भारतातील सुमारे 250 दशलक्ष 2G ग्राहकांना लक्ष्य करू पाहत आहे. हे ग्राहक सध्या एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया सारख्या कंपन्यांशी संबंधित आहेत. रिलायन्स जिओ फक्त 4G आणि 5G नेटवर्क चालवते. रिलायन्स जिओचा दावा आहे की 'Jio Bharat V2' च्या आधारे कंपनी 10 कोटींहून अधिक ग्राहक जोडेल. जिओभारत व्ही2 चा महिन्याचा प्लॅन देखील सर्वात स्वस्त आहे. अमर्यादित व्हॉइस कॉलसाठीच्या या 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी ग्राहकांना केवळ 123 रुपये द्यावे लागतील, ज्यामध्ये 14 जीबी डेटाचा समावेश आहे. इतर ऑपरेटरचा व्हॉईस कॉल आणि 2 जीबीचा मासिक प्लॅन 179 रुपयांपासून सुरू होतो.

याआधी 2G ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 2018 मध्ये जिओ फोन देखील आणला होता. जिओफोन आजही 13 कोटींहून अधिक ग्राहकांची पसंती आहे. कंपनीला 'Jio Bharat V2' कडूनही त्याच अपेक्षा आहेत. कंपनीने 7 जुलैपासून 'Jio Bharat V2' ची बीटा ट्रायल सुरू करण्याची घोषणा केली आहे. (हेही वाचा: Twitter Rate Limits मध्ये वाढ करणार; Elon Musk ची माहिती, नव्या नियमामुळे जगभरात #TwitterDown चा गोंधळ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)