Apple ने नुकतेच iPhone वरून सर्वोत्कृष्ट मॅक्रो शॉट्स घेण्यासंबंधी एक स्पर्धा आयोजित केली होती. आता Apple ने या मॅक्रो चॅलेंजमध्ये घेतलेल्या सर्वोत्कृष्ट फोटोंच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये कोल्हापूरमधील प्रज्वल चौगुलेचे नाव समाविष्ट आहे. प्रज्वलने iPhone वरून कोळ्याच्या जाळ्यावर पडलेले दवाचे थेंब टिपले आहेत.

याबाबत प्रज्वल म्हणतो, 'मी एक निसर्गप्रेमी आहे आणि मला माझ्या iPhone 13 Pro सह पहाटे फिरायला जाणे आवडते. सकाळचा ‘गोल्डन अवर’ निसर्गातील सर्वोत्कृष्ट गोष्टी छायाचित्रकारांना आनंद देतो. अशाच एका कोळ्याच्या जाळ्यावरील दवबिंदूंनी माझे लक्ष वेधून घेतले व तो क्षण मी माझ्या iPhone 13 Pro ने टिपला.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)