सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम पुन्हा एकदा डाऊन झाल्याची चर्चा आहे. इन्स्टाग्रामला समांतर असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अनेकांनी (वापरकर्ते) इन्स्टाग्राम डाऊन असल्याच्या तक्रीर केल्या आहेत. बुधवारी (5 एप्रिल) सकाळी ट्विटर वापरकर्त्यांनी इन्स्टाग्राम डाऊन असल्याचे स्क्रीन शॉट शेअर केले. सोशल मीडियावरील दाव्यानुसार इन्स्टाग्राम सकाळी 8.06 वाजलेपासून बंद आहे. इन्स्टाग्रामने बीटा अवृत्ती (व्हर्जन) लॉन्च केल्यापासून अनेकांना या तक्रारी जाणवत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जगभरातील हजारो वापरकर्त्यांसाठी इंस्टाग्राम डाऊन, ट्विटरवर मजेदार मीम्स आणि जोक्स फुटले.

Instagram हे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि वापरले जाणारे सोशल प्लॅटफॉर्म आहे. खास करु फोटो, व्हिडिओ आणि रिल्स यांसाठी तो जगभरात प्रसिद्ध आहे.

ट्विट

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)