Mumbai Police React to Elon Musk's Tweet: तुम्हाला आतापर्यंत पोलिस दलातील कुत्र्यांची माहिती असू शकते जे गुन्ह्याच्या प्रकरणात संभाव्य लीड शोधण्यात मदत करतात. कुत्र्यांप्रमाणेच पोलिसांच्या टीममध्येही मांजरी असतात का? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? हा प्रश्न एलोन मस्कचा मुलगा लिल एक्सच्या मनात निर्माण झाला आणि इंटरनेटवर व्हायरल झाला. लोकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दिल्ली पोलिसांनी उत्तर दिल्यानंतर, मुंबई पोलिसांनीही या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

मुंबई पोलिसांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया -

मुंबई पोलिसांनी शनिवारी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आणि म्हटले, 'पोलिस स्टेशनमध्ये मांजरींचे स्वागत आहे. म्याव-म्याव सलाख्यांच्या मागे राहतात.' पोलिस दलात कुत्र्यांसारखेचं 'पोलीस मांजरी' असतात का? असा कुतूहलाने विचारणाऱ्या इलॉन मस्कने त्याचा मुलगा लिल एक्सबद्दल केलेल्या ट्विटनंतर काही तासांनी दिल्ली पोलिसांनी त्याला उत्तर देण्याचा निर्णय घेतला. संबंधित सुरक्षा दलात केवळ पोलिस कुत्रे आणि मांजर नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामागील संभाव्य कारण सांगताना, त्यांनी एक विचित्र ट्विट केले. (हेही वाचा - Elon Musk World's Richest Person: एलन मस्क पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती आहे संपत्ती? घ्या जाणून)

Mumbai Police React to Elon Musk's Tweet (PC - Instagram)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)