Chameleon Android Malware Alert: जर तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ता असाल तर सतर्क राहण्याची गरज आहे. तुमचा फोन कधीही हॅक होऊ शकतो किंवा त्यात मालवेअर असू शकतो. कारण आता पुन्हा एकदा अँड्रॉइड फोन मालवेअरला बळी पडत आहेत. Chameleon नावाचा मालवेअर समोर आला आहे जो अँड्रॉइड फोनला लक्ष्य करत आहेत. रिपोर्टनुसार, हा मालवेअर इतका धोकादायक आहे की तो कोणत्याही डिव्हाइस किंवा फोनचा पासवर्ड पाहू शकतो आणि कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेला बायपास करू शकतो. हा मालवेअर एक असे तंत्रज्ञान वापरते जे फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक अक्षम करून आणि डिव्हाइस पिन चोरून हॅकर्सना डिव्हाइस ताब्यात घेण्यास मदत करते. सायबर सिक्युरिटी रिसर्च फर्म थ्रेटफॅब्रिकने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हे वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय अनेक प्रकारच्या परवानग्या देखील घेऊ शकते. (हेही वाचा: Cyber Attack: भारतीय संस्थांना सायबर हल्ल्यांचा धोका सर्वात जास्त, सर्वेक्षणातून माहिती आली समोर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)