दिल्लीतील विजयासह भारत कसोटी क्रमवारीतही अव्वल क्रमांकाचा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाकडून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी जिंकून त्याला क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. या कसोटीच्या दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली स्थिती निश्चितच मजबूत केली होती, मात्र तिसर्या दिवसाचे पहिले सत्र त्यांच्यासाठी खूपच खराब झाले आणि ते टीम इंडियाला मोठे लक्ष्य देऊ शकले नाहीत. याचा परिणाम असा झाला की आता भारतीय संघाने या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
2ND Test. India Won by 6 Wicket(s) https://t.co/hQpFkyZGW8 #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)