भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर, जवळपास 1 महिना हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर, तो आता त्याच्या घरी पोहोचला आहे, तेथून तो सोशल मीडियावर चाहत्यांना त्याच्या बरे होण्याबद्दल अपडेट करत आहे. आता ऋषभने 10 फेब्रुवारीच्या संध्याकाळी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये तो आता थोडं थोडं चालायला लागल्याचं स्पष्ट दिसत आहे. ऋषभ पंतने आपल्या ट्विटमध्ये फोटो पोस्ट केला आणि लिहिले की एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत, एक पाऊल चांगले. पंतच्या या पोस्टवरून त्याची सुधारणा चांगली होत असल्याचे स्पष्ट होते. हेही वाचा IND vs AUS: कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारताचा ऑस्ट्रेलियावर पगडा जड, घेतली 144 धावांची आघाडी
One step forward
One step stronger
One step better pic.twitter.com/uMiIfd7ap5
— Rishabh Pant (@RishabhPant17) February 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)