Wimbledon 2021 Draw: विम्बल्डन (Wimbledon) 2021 चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीचा ड्रॉ जाहीर झाला आहे. आठवेळा चॅम्पियन रॉजर फेडररला (Roger Federer) 13 व्या विम्बल्डन फायनलमध्ये प्रवेश करावयाचा असेल तर डॅनियल मेदवेदेव आणि अलेक्झांडर झव्हेरेव्हला संभाव्यतः पराभूत करावे लागेल. फेडररचे लक्ष्य पुरुषांचे रेकॉर्ड 21 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्यावर असेल. तसेच महिलांच्या ड्रॉमध्ये 23 ग्रँड स्लॅम विजेती सेरेना विल्यमसनचा (Serena Williams) पहिल्या फेरीत सामना अलीक्सांद्रा सास्नोविचशी होणार आहे. सेरेनाने यंदाचे विजेतेपद जिंकल्यास ती मार्गारेट कोर्टच्या (Margret Court) रेकॉर्ड 24 ग्रँड स्लॅम रेकॉर्डची बरोबरी करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)