भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आघाडी उघडत देशातील अव्वल कुस्तीपटू दीर्घकाळापासून या खेळापासून दूर आहेत. येथे, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया (OCA) ने निश्चित केलेल्या 15 जुलैच्या मुदतीपूर्वी आशियाई खेळांसाठी संघ अंतिम करण्याचे सर्व राष्ट्रीय महासंघांचे लक्ष्य आहे. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे खेळ होणार आहेत. यामध्ये साक्षी मलिक हिने आशिया खेळावर आपली प्रतिक्रिया दिली आहे "आम्ही आशियाई खेळांमध्ये तेव्हाच सहभागी होऊ जेव्हा या सर्व समस्यांचे निराकरण होईल. आम्ही दररोज मानसिकरित्या कशातून जात आहोत हे तुम्हाला समजू शकत नाही" असे ती म्हणाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)