Tokyo Paralympics 2021: दोन वेळा पॅरालंपिक (Paralympic) सुवर्णपदक विजेता देवेंद्र झझारियाने (Devendra Jhajharia) पुन्हा एकदा स्वत:चा विश्वविक्रम मोडला आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) स्पर्धेचे तिकीट मिळवले. 40, झझारियाने भाला 65.71 मीटर अंतरावर फेकत 63.97 मीटर लांबीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला ज्याने त्याला 2016 रिओ पॅरालंपिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करून दिली होती. झझारियाने ट्विटरवर आपल्या कामगिरीची माहिती देत कुटुंब, प्रशिक्षक आणि फिटनेस ट्रेनरचे आभार मानले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)