Ravi Dahiya Bitten By Nurislam Sanayev: कझाकिस्तानच्या पैलवानने ऑलिम्पिक उपांत्य फेरीत घेतला Ravi Dahiya याच्या हाताचा चावा, सेहवाग म्हणाला लुजर (Watch Video)
कझाकिस्तानचा पैलवान नुरीस्लॅम सनयेव याच्यावर ऑलिम्पिक सेमीफायनल सामन्यात मात करून भारताच्या रवी कुमार दहियाने 57 किलो वजनी गटाच्या फायनलचं तिकीट मिळवलं आहे. खेळाच्या शेवटच्या मिनिटादरम्यान, जेव्हा दहिया 5-9 ने पिछाडीवर होता, तेव्हा सनयेवने त्याच्या हाताचा चावा घेतला. सोनी स्पोर्ट्सने त्यांच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ही घटना स्पष्टपणे दिसत आहे.
Ravi Dahiya Bitten By Nurislam Sanayev: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळाच्या चुरशीच्या सेमीफायनल सामन्यात भारताच्या रवी कुमार दहियाने (Ravi Kumar Dahiya) 57 किलो वजनी गटाच्या फायनलचं तिकीट मिळवलं पण खेळाच्या शेवटच्या मिनिटादरम्यान, जेव्हा दहिया 5-9 ने पिछाडीवर होता, तेव्हा कझाकिस्तानचा पैलवान नुरीस्लॅम सनयेवने (Nurislam Sanayev) त्याच्या हाताचा चावा घेतला.
भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने या संपूर्ण घटनेला लज्जास्पद म्हणत कझाग पैलवानला लुजर म्हणून संबोधले.
How unfair is this , couldn’t hit our #RaviDahiya ‘s spirit, so bit his hand. Disgraceful Kazakh looser Nurislam Sanayev.
Ghazab Ravi , bahut seena chaunda kiya aapne #Wrestling pic.twitter.com/KAVn1Akj7F
— Virender Sehwag (@virendersehwag) August 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2021 11:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

