भारतीय बॅडमिंटन असोसिएशन (Badminton Association of India) ने गुरुवारी 2022 मध्ये आशियाई खेळ (Asian Games), राष्ट्रकुल खेळ आणि थॉमस व उबेर चषक या प्रमुख स्पर्धांसाठी संघांची घोषणा केली आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) सुवर्णपदक विजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) हिला डच्चू देण्यात आला आहे, परंतु 14 वर्षीय उन्नती हुडा (Unnati Hooda) हिला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये महिलांच्या आव्हानाचे नेतृत्व करेल तर लंडन ऑलिम्पिक कांस्य विजेती सायना नेहवालला संघात अपेक्षित स्थान मिळाले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)