युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातील दीर्घकाळ तणावानंतर आता युद्धाला तोंड फुटले आहे. यानंतर आज आंतरराष्ट्रीय जुडो महासंघाने (International Judo Federation) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना IJF च्या मानद अध्यक्ष पदावरून निलंबित केले आहे. “युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्ध संघर्षाच्या पार्श्वभूमिवर आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने श्री व्लादिमीर पुतीन यांचा आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनचे मानद अध्यक्ष आणि राजदूत म्हणून पद निलंबित करण्याची घोषणा केली,” IJF ने एका निवेदनात म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)