Russia Attacks Ukraine: रशियाच्या युक्रेनवर आक्रमणानंतर नवीन नंबर 1 पुरुष टेनिसपटू Daniil Medvedev ने शांततेचे केले आवाहन, पाहा काय म्हणला रशियन खेळाडू
टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव गुरुवारी पुरुष एकेरी टेनिसमध्ये नवीन जागतिक क्रमांक 1 बनणार असल्याचे निश्चित झाले परंतु युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या बातम्या ऐकून टेनिसवर लक्ष केंद्रित करणे सोपे नाही असे रशियन स्टारने सांगितले. रशियन डॅनिल मेदवेदेव या संकटावर भाष्य करताना म्हणाला की त्याला जगभरात शांतता वाढवायची आहे.
Russia Attacks Ukraine: टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव (Daniil Medvedev), जो नवीन टॉप-रँकिंग पुरुष एकेरी खेळाडू बनण्यासाठी सज्ज आहे, त्याने सांगितले की तो शांततेचा प्रचार करत आहे आणि त्याने युक्रेनवरील रशियन आक्रमणावर (Russia-Ukraine War) बोलताना लोकांनी एकत्र राहावे अशी त्याची इच्छा असल्याचे म्हटले. मेदवेदेवने मेक्सिकन ओपन (Mexico Open) उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या योशिहितो निशिओकाविरुद्ध विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन राफेल नदाल (Rafael Nadal) विरुद्ध उपांत्य फेरी सामन्यात प्रवेश केला.
Russian Daniil Medvedev said he wanted to promote peace around the world after a "roller-coaster day" when he was confirmed as the world's top tennis player and his country invaded Ukraine. https://t.co/egXedBW9Fr
— Reuters Sports (@ReutersSports) February 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2022 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

