Roland Garros 2021: जगातील दुसर्‍या क्रमांकाची महिला टेनिसपटू जपानची नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) फ्रेंच ओपनमधून (French Open) माघार घेतली आहे. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले ज्यामुळे तिला 15,000 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. या कारवाईनंतर दुसऱ्या फेरीपूर्वी ओसाकाने स्पर्धेतून माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. मानसिक आरोग्यामुळे (Mental Health) फ्रेंच ओपनदरम्यान माध्यमांशी बोलणार नाही, असे 23-वर्षीय ओसाकाने स्पर्धेपूर्वी सांगितले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)