Paris Olympics 2024 Neeraj Chopra Final Live Streaming: भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आज इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो भाग घेईल आणि सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव करण्याचा प्रयत्न करेल. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यास भालाफेकचे विजेतेपद राखणारा तो ऑलिम्पिक इतिहासातील पाचवा खेळाडू ठरेल. यासह वैयक्तिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. दरम्यान, नीरज चोप्राचा भालाफेकचा अंतिम सामना आज म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार नीरज चोप्राची फायनल रात्री 11:55 वाजता सुरू होईल. तुम्ही ते स्पोर्टस 18 1 आणि स्पोर्टस 18 1 HD चॅनेलवर इंग्रजी आणि हिंदी दोन्हीमध्ये पाहू शकता. याशिवाय या फायनलचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवरही केले जाईल. तसेच, जियो सिनेमा ॲप आणि त्याच्या वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
"Final mei pressure hoga par taiyaari poori hai" 💪🥹
Catch Neeraj Chopra aim for glory at #Paris2024, LIVE from 11:55 PM on #Sports18 and stream for FREE on #JioCinema! 👈
#OlympicsOnJioCinema #OlympicsOnSports18 #JioCinemaSports #NeerajChopra #Athletics pic.twitter.com/y0NSzZkNlk
— JioCinema (@JioCinema) August 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)