FIFA World Cup 2022 Final: कतारमध्ये खेळला गेलेला फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम रोमांचक सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स (ARG vs FRA) यांच्यात हा सामना झाला. यादरम्यान दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पण शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला आणि इथे लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. या विजयानंतर कोल्हापूरातील तरुणांनी जबरदस्त जल्लोष केला. चौकाचौकात मोठमोठे स्क्रीन लावून या मॅचचा आनंद लुटण्यात आला. त्यांनी केलेल्या या आनंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ
कोल्हापुरी जल्लोष नाद खुळा , kolhapur in Maharashtra has become Buenos Aires . #WorldCup #Argentina ( courtesy WhatsApp ) ... pic.twitter.com/EBmDCQdAoQ
— Sahil Joshi (@sahiljoshii) December 18, 2022
अर्जेंटिना मध्ये जल्लोष नसेल इतका जल्लोष कोल्हापुरात चालू आहे ??? pic.twitter.com/J33iFaVBCu
— Hrishikesh S Patil - INC (@hrishipatil1) December 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)