नोव्हाक जोकोविचने कॅस्पर रुडचा पराभव करून फ्रेंच ओपन 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने अंतिम फेरीत रुडचा 7-6, 6-3, 7-5 असा पराभव केला. जोकोविचचे हे एकूण 23 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तो आता टेनिस विश्वातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू बनला आहे. त्याने राफेल नदालला मागे टाकले आहे. पहिल्या सेटमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला कॅस्पर रुडने कडवी झुंज दिली. पण जोकोविचने आपल्या अनुभवाचा उपयोग करून पहिला सेट 7-6 अशा जवळच्या फरकाने जिंकला. यानंतर दुसऱ्या सेटमध्येही त्याने वर्चस्व कायम राखले. मात्र दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची झुंज पाहायला मिळाली. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने 6-3 ने विजय मिळवला. तिसऱ्या सेटमध्ये सर्बियन खेळाडूने 7-5 असा विजय मिळवला आणि सेटसह फ्रेंच ओपन 2023 चे विजेतेपद पटकावले. जोकोविचने या सामन्यात एकही सेट गमावला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)