FIFA World Cup 2022 Final Prize Money: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने गतविजेत्या फ्रान्सचा (ARG vs FRA) पराभव केला आहे. यासह अर्जेंटिनाच्या संघाने 36 वर्षांनंतर फिफा विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला आहे. चॅम्पियन अर्जेंटिनाने 18 कॅरेट सोन्याची चमकणारी ट्रॉफी आणि $ 42 दशलक्ष म्हणजे सुमारे 347 कोटी रुपये जिंकले आहेत. तसेच फायनलमध्ये पराभूत झालेल्या फ्रेंच संघावर पैशांचा पाऊस पडला आणि या संघाला 30 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 248 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्रोएशिया संघाला जवळपास 223 कोटी रुपये मिळाले आहेत. (हे देखील वाचा: FIFA World Cup 2022 Awards List: विश्वचषकानंतर 'या' खेळाडूंना मिळाले 'हे' पुरस्कार, संपूर्ण पुरस्कार यादी पहा येथे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)