हैदराबादने या सामन्यात मोसमातील आपला दुसरा विजय नोंदवला आहे. याशिवाय गुजरातचा या मोसमातील हा पहिलाच पराभव आहे. हैदराबादने हा सामना 8 विकेटने जिंकला. 163 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात संथ झाली. अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. यादरम्यान अभिषेक 42 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर केन आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाची धुरा सांभाळली आणि धावसंख्या पुढे नेली. मात्र, दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याचवेळी विल्यमसनही 57 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर पूरन आणि मार्करामने संघाची धावसंख्या पुढे नेली. अखेर या दोन्ही खेळाडूंनी संघाला विजय मिळवून दिला.
That's a FIFTY for the #SRH Skipper.
Will he convert it into a match winning one?
Live - https://t.co/9CemDpHOvq #SRHvGT #TATAIPL pic.twitter.com/5OFiY6AJED
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)