अमेरिकन कंपन्यांमध्ये टाळेबंदीचा टप्पा सुरूच आहे. आता वॉल्ट डिस्नेचे नावही कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत सामील झाले आहे. कंपनीने 7,000 कर्मचाऱ्यांची (डिस्ने लेऑफ) घोषणा केली आहे. डिस्नेची व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा Disney + Hotstar ने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 38 लाख सशुल्क सदस्य गमावले आहेत. सक्रिय गुंतवणूकदार नेल्सन पेल्त्झ यांनी देखील कंपनीवर स्ट्रीमिंग सेवेवर प्रचंड खर्च केल्याचा आरोप केला. यूजर बेस कमी झाल्यानंतरच कंपनीने खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. असा अंदाज आहे की टाळेबंदीमुळे वार्षिक 5.5 अब्ज डॉलर्सची बचत होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)