भारताने आजच्याच दिवशी 2011 साली विश्वचषक जिंकला (World Cup 2011) होता. आजच्याच दिवशी टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले होते. यापुर्वी 1983 साली कपिल देवच्या (Kapil Dev) नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर  2 एप्रिल 2011 साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने हा इतिहास रचला होता. या विश्वचषकात महत्त्वपुर्ण कामगिरी करणारा भारताचा फलंदाज युवराज सिंहने या विजयाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांने या संदर्भात एक पोस्ट केली आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)