इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 48 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 9-9 सामने खेळले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्सचे 6 आणि राजस्थान रॉयल्सचे 5 विजय आहेत. गुजरात टायटन्सचा 12 गुणांसह +0.532 चा निव्वळ रन रेट आहे, तर राजस्थान रॉयल्सचा 10 गुण आणि निव्वळ रन रेट +0.800 आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत राजस्थान रॉयल्स संघाला पाचवा मोठा धक्का बसला. राजस्थान रॉयल्स संघाचा स्कोअर 69/4.
Match 48. WICKET! 9.2: Riyan Parag 4(6) lbw Rashid Khan, Rajasthan Royals 69/5 https://t.co/54xkkylevZ #TATAIPL #RRvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)