India National Cricket Team vs Autralian Men's National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू मैदानात उतरताच त्यांच्या हातावर काळ्या पट्ट्या बांधल्याचे दिसून आले. यामागील कारण म्हणजे एक दिवस आधी मुंबईचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर (Mumbai cricketer Shri Padmakar Shivalkar Demise) यांचे निधन झाले होते. ते 84 वर्षांचे होते, ते 20 वर्षे स्थानिक स्पर्धांमध्ये मुंबईकडून खेळले. मुंबईचे दिग्गज पद्माकर शिवलकर यांच्या निधनानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हातावर काळ्या पट्ट्या बांधून उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी उतरले.
In honour of the late Shri Padmakar Shivalkar, Team India is wearing black armbands today.
— BCCI (@BCCI) March 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)