टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 108 षटकांत 5 गडी गमावून 229 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 128 षटकांत 473 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 121 धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 115.4 षटकात 255 धावांवर गारद झाला. टीम इंडियाने 183 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.
Innings Break!
Superb show with the ball from #TeamIndia to bowl out West Indies for 255 👌 👌
5⃣ wickets for @mdsirajofficial
2⃣ wickets each for @imjadeja & Mukesh Kumar
1⃣ wicket for @ashwinravi99
Scorecard ▶️ https://t.co/d6oETzoH1Z#WIvIND pic.twitter.com/NCeJU3SK6p
— BCCI (@BCCI) July 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)