भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने (IND vs AUS) विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. कोहलीने सामन्याच्या सुरुवातीलाच जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेतला. या झेलसह विराट वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात मिचेल मार्शच्या रूपाने भारताने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने डावाच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या षटकात मिचेल मार्शला स्लिपमध्ये झेलबाद केले. बुमराहने चेंडू बाहेर स्विंग केला, जो खेळत असताना मार्शच्या बॅटला लागला. त्याचवेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने डावीकडे डायव्हिंग करत शानदार झेल घेतला. मार्शला 6 चेंडूत एकही धाव करता आली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)