KKR vs RCB, IPL 2025 1st T20 Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 आजपासून सुरूवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघ (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट संघ (RCB) यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. केकेआरने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याच वेळी, आरसीबी संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक झळकावले आहे. आरसीबीची धावसंख्या 143/2
Kohli smacks it over cover to get his fifty off just 30 balls
RCB on track
LIVE: https://t.co/RZC1P0qWLc | #KKRvRCB pic.twitter.com/g9lnz1OH1a
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)