आज टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत अवघ्या 106 चेंडूत वनडेतील 50 वे शतक पूर्ण केले. विश्वचषकातील तिसरे शतक झळकावण्याबरोबरच विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा वनडेतील 49 शतकांचा विक्रमही मागे टाकला. त्याने 106 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. ज्यानंतर त्याने महान सचिन तेंडुलकरसमोर नतमस्तक होऊन आभार मानले, त्याचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)