बांगलादेशचा संघ आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मधून बाहेर पडला आहे. अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध साखळी फेरीतील दुसरा सामना गमावल्याने बांगलादेशचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. यानंतर बांगलादेश संघाचा महान यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim) मोठी घोषणा केली आहे. मुशफिकुर रहीमने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया चषकाच्या 15 व्या मोसमात बांगलादेशच्या संघाची कामगिरी खराब होती. यासोबतच मुशफिकुर रहीमचाही खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश होता. त्याने दोन सामन्यात एकूण 5 धावा केल्या. अफगाणिस्तानविरुद्ध तो 4 चेंडूत 1 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याच्या बॅटने 5 चेंडूत 4 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)