United States vs Ireland 30th Match: फ्लोरिडामध्ये खेळल्या जाणाऱ्या अमेरिका आणि आयर्लंड (USA vs IRE) यांच्यातील सामना पावसामुळे प्रभावित झाला असून तो रद्द करावा लागला. हा सामना न झाल्यामुळे अमेरिका आणि आयर्लंडला प्रत्येकी एक गुण मिळाला, त्यामुळे पाकिस्तानचा (Pakistan) प्रवास ग्रुप स्टेजमध्येच थांबला. यूएसने ग्रुप स्टेजमध्ये दोन विजय आणि एक पराभवासह चार सामन्यांतून पाच गुणांसह दुसरे स्थान मिळवले आणि सुपर-8 टप्प्यासाठी पात्र ठरले. भारतीय संघाने अ गटातून आधीच पुढील फेरीत प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या पात्रतेसह, 2009 चा चॅम्पियन पाकिस्तान अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
The fate of Group A is 🔒
USA advance to the Super Eight of the #T20WorldCup 2024 as they share a point each with Ireland 👏#USAvIRE pic.twitter.com/NvlDPT0T0Y
— ICC (@ICC) June 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)