Indian National Under-19 Cricket Team vs United Arab Emirates National Under-19 Cricket Team ACC U19 Asia Cup 2024: ACC अंडर-19 आशिया चषक 2024 चा 12 वा सामना आज भारतीय राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ विरुद्ध UAE राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकाने विजय तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय अ गट गुणतालिकेत 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, यूएई संघानेही दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकाने विजय तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यूएईचा संघ अ गटात गुणतालिकेत 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. विजेता संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. दरम्यान, यूएईने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
UAE अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अक्षत राय, आर्यन सक्सेना, यायिन राय, एथन डिसोझा, मुहम्मद रायन खान, अयान अफजल खान (कर्णधार), नुरुल्ला अयोबी, मुदित अग्रवाल (विकेटकीपर), उदीश सुरी, हर्ष देसाई, अली असगर शम्स .
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ क, मोहम्मद अमन (कर्णधार), केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (विकेटकीपर), हार्दिक राज, समर्थ नागराज, चेतन शर्मा, युधाजित गुहा.
UAE U19 won the toss and elected to bat first against India U19, while Pakistan chose to bat first against Japan U19.
Match 11 | Pakistan U19 vs Japan U19 | https://t.co/S5qR7Zqv1i
Match 12 | India U19 vs UAE U19 | https://t.co/eDcmUzTjsc#ACC #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/LkTZimcttC
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)