कोलंबो: भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्यापासून 3 सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका (IND vs SL ODI Series 2024) खेळवली जाणार आहे. याआधी टी-20 क्रिकेट मालिकेत भारताने श्रीलंकेला पराभूत करत क्लीन स्वीप केला होता. आता एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचे स्टार गोलंदाज मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिलशान मदुशंकाच्या डाव्या हाताला दुखापत झाली. तर मथेशा पाथिराना यांच्या उजव्या खांद्याला मोच आली आहे. या दोन खेळाडूंच्या जागी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 3 खेळाडूंना स्टँडबाय म्हणून संघात समाविष्ट केले आहे. यात कुसल जानिथ, प्रमोद मदुशन आणि जेफ्री वँडरसे यांच्या भूमिका आहेत. (हे देखील वाचा: Virat Kohli New Milestone: श्रीलंका दौऱ्यावर 'किंग'कोहली करणार मोठा विक्रम, कुमार संगकाराच्या 'या' रेकाॅर्डवर असेल लक्ष्य)
🚨 Matheesha Pathirana and Dilshan Madushanka will not take part in the ODI series as the players have sustained injuries. 🚨
Dilshan Madushanka suffered a left hamstring injury (Grade 2), the player sustained during fielding at practices.
Pathirana has suffered a mild sprain on… pic.twitter.com/t5hqtTPdKC
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)