IND vs ENG 5th Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (IND vs ENG 5th Test) गुरुवारपासून धर्मशाळा येथे खेळवला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 218 धावा केल्या. भारताकडून कुलदीपने 5 तर अश्विनने चार आणि जडेजाने 1 विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 477 धावा केल्या आणि इंग्लंडवर 259 धावांची आघाडी घेतली. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतक ठोकले. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदांजीला आलेल्या इंग्लंडला तिसरा धक्का लागला आहे. आर अश्विनने डकेट-क्रॉली आणि पोपला बाद केले आहे. इंग्लंडचा स्कोर 41/3
Ashwin weaving his magic 🪄 in Dharamsala!
A fine running catch from Yashasvi Jaiswal! 👍
England 3 down as Ollie Pope departs.
Follow the match ▶️ https://t.co/jnMticF6fc #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vsWu0TJ6c8
— BCCI (@BCCI) March 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)