भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (24 जानेवारी) म्हणजे आज इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया 2017 नंतर होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. या मैदानावर टीम इंडियाला वनडेत अद्याप पराभव पत्करावा लागला नाही. अशा परिस्थितीत हाच क्रम कायम ठेवत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष असेल. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये 12 धावांनी तर दुसरा सामना रायपूरमध्ये 8 विकेटने जिंकला होता. भारताची नजर सलग दुसऱ्या मालिकेत क्लीन स्वीपकडे असेल. तसेच हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय मालिका प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता. तसेच भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. तुमच्या घरी टाटा स्काय कनेक्शन असल्यास, तुम्ही टाटा प्ले अॅपवरही सामना पाहू शकता. यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क देखील लागणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)