बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (IND vs AUS) आता वनडे मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमधील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघात सर्वात मोठा बदल कर्णधारांमध्ये झाला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या सामन्यात उपस्थित राहणार नाही, अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असेल. दरम्यान, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. सामन्याचे थेट प्रवाह Disney + Hotstar अॅपवर उपलब्ध असेल.
Hello & welcome to our LIVE coverage of the 1st ODI between #INDvAUS from Wankhede Stadium 🏟️ Mumbai 🇮🇳vs🇦🇺
🏏 𝐋𝐢𝐯𝐞 𝐓𝐡𝐞 𝐆𝐚𝐦𝐞 𝐨𝐧 𝐃𝐃 𝐒𝐩𝐨𝐫𝐭𝐬 📺 (𝐃𝐃 𝐅𝐫𝐞𝐞 𝐃𝐢𝐬𝐡)#TeamIndia | #INDvsAUS | #MenInBlue pic.twitter.com/qk6mCs5NJf
— Doordarshan Sports (@ddsportschannel) March 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)