विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया तिथे पोहोचल्यानंतर वेळ न गमावता मैदानात उतरली आहे. टीम इंडिया सध्या पर्थमध्ये आहे, जिथे ते वर्ल्डकपची तयारी करणार आहेत. पर्थला पोहोचल्यानंतर भारतीय संघाने शुक्रवारी सकाळी प्रतिष्ठित वाका स्टेडियमवर पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारा भारतीय टी-20 संघ आणि सपोर्ट स्टाफ गुरुवारी मुंबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंनी प्रतिष्ठित पर्थच्या मैदानावर सराव सुरू केल्याचे फोटो शेअर केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)