भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी, 6 ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये खेळला जात आहे, जो पावसामुळे उशिरा सुरू झाला. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना 40-40 षटकांचा आहे. आज भारतीय क्रिकेट संघासाठी दोन खेळाडूंनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे खेळून वनडे संघात पदार्पण केले आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि आवेश खान

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

जानेमन मालन, क्विंटन डी कॉक (wk), टेम्बा बावुमा (c), एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शामसी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)