IND vs AUS 4th Test 2024: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळत असलेल्या टीम इंडियानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामुळेच संघाचे खेळाडू सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हाताला काळ्या पट्ट्या बांधून खेळायला आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)