IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL 3rd ODI) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात श्रीलकांने भारताचा 110 धावांनी पराभव करत 27 वर्षानंतर वनडे मालिकेवर कब्जा केला आहे. तत्तपुर्वी, श्रीलंकाने टाॅस जिकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेसाठी सलामीवीर अविष्का फर्नांडोने 96 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघ 26.1 षटकात सर्वबाद 138 धावा करु शकला. भारताकडून सर्वाधिक रोहित शर्माने 35 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून दुनिथ वेललागेने 5 विकेट घेतल्या.
3RD ODI. Sri Lanka Won by 110 Run(s) https://t.co/Lu9YkAmnek #SLvIND #3rdODI
— BCCI (@BCCI) August 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)