विजयाच्या रथावर स्वार झालेल्या भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लंड क्रिकेट (IND vs ENG) संघाशी आहे. दोन्ही संघांमधला हा सामना 29 ऑक्टोबर रोजी लखनौ येथील एकना स्पोर्ट्स सिटी येथे खेळवला जाईल. रोहित आणि कंपनी आगामी सामन्यासाठी सज्ज असून लखनौला पोहोचले आहेत. भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या क्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हॉटेल कर्मचाऱ्यांकडून खेळाडूंचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करताना दिसत आहे. बीसीसीआयने हा व्हिडिओ X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला आणि लिहिले, 'हॅलो लखनऊ. भारतीय संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धच्या आगामी सामन्यासाठी येथे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)