भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ (IND W vs ENG W) यांच्यात आजपासून म्हणजेच 6 डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तीन सामन्यांची महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दोन्ही संघांमध्ये 27 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत इंग्लंड संघाने 20 सामने जिंकले आहेत. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक.
इंग्लंड: डॅनिएल व्याट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माहिका गौर.
India hand T20I caps to allrounder Shreyanka Patil and left-arm spinner Sakia Ishaque 👏
Will we get a cracker at Wankhede?
LIVE 👉 https://t.co/rX8p7LKM3H | #INDvENG pic.twitter.com/JXhsjIX5qc
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)