MI vs KKR, IPL 2024: आज आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहे. (MI vs KKR) हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. केकेआर संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई संघ नवव्या स्थानावर आहे. म्हणजेच दोन्ही संघांना हा सामना जिंकून पुढे जायचे आहे. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या कोलकाताने 20 षटकात 169 धावा केल्या आहे. केकेआरकडून व्यंकटेश अय्यर 57 आणि मनीष पांडेने 42 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर मुंबईकडून तुषाराने आणि बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहे. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 170 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा स्टार फलंदांज सूर्याने वेगात अर्धशतक झळकावले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)