वेस्ट इंडिजचा (West Indies) अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने (Sunil Narine) बुधवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमधील संयुक्त दुसरे-जलद अर्धशतक ठोकून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. नारायणने बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League) 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मीरपूरच्या शेरे बांगला स्टेडियमवर चट्टोग्राम चॅलेंजर्सविरुद्ध कोमिल्ला व्हिक्टोरियन्सच्या डावाची सुरुवात करताना हा टप्पा गाठला. नारायणने त्याच्या दमदार खेळीत 5 चौकार आणि 6 षटकार ठोकले. नारायणने 13व्या चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, पण टी-20 क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या जागतिक विक्रमापासून त्याला फक्त 1 चेंडू कमी पडला.
OMGHBFUEBFIOEBV...
Brb, collecting our jaws from the floor! 🤯
📺 WATCH THE FASTEST-EVER 50 IN THE HISTORY OF #BPL ON #FANCODE 👉 https://t.co/zQb7mURAnc#BPLonFanCode #BBPL2022 @SunilPNarine74 pic.twitter.com/SJcxCojRg1
— FanCode (@FanCode) February 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)